शासकीय संकेतस्थळावर श्री महालक्ष्मी देवीसह कोल्हापूर जिल्ह्यातील चुकीचे ऐतिहासिक संदर्भ : भाविकांमध्ये संतापाची लाट

कोल्हापूर – जिल्हा प्रशासनाच्या वतीने kolhapur.gov.in या नावाने अधिकृत संकेतस्थळ चालवण्यात येते. या संकेतस्थळावर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची चुकीची माहिती देण्यात आली आहे. याचसमवेत जिल्ह्यातील अनेक ऐतिहासिक चुकीचे संदर्भ देण्यात आले आहेत. या संदर्भात भाविकांसह इतिहास अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

संकेतस्थळावर देण्यात आलेली काही चुकीची माहिती

१. श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती ही हिरक नावाचा धातू मिसळून सिद्ध करण्यात आली आहे. ज्याच्यापासून मूर्तीवर प्राचीन काळापासून प्रकाश फेकला जातो.

२. श्री महालक्ष्मी देवीच्या डाव्या हातात पानाचे ताट आहे.

३. जुना राजवाडा इथे राजर्षी शाहू महाराज यांचे थडगे आहे.

४. वर्ष १८१३ मध्ये सदाखान यांनी भवानी भंडप बांधला आहे. पन्हाळ्याविषयी अनेक चुकीचे संदर्भ देण्यात आले आहेत.

५. या संकेतस्थळावर देण्यात आलेले अनेक संदर्भ चुकीचे असून दिनांक चुकले आहेत, तसेच शुद्धलेखनाच्या गंभीर चुका आहेत.