तीनहून अधिक रुग्ण आढळल्यास ५० मीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार !
महापालिका आयुक्तांची पोलीस आणि शासकीय अधिकारी यांच्यासमवेत समन्वय बैठक
सोलापूर – येथील कोणत्याही इमारतीमध्ये किंवा परिसरात तीनहून अधिक रुग्ण आढळल्यास तो परिसर ५० मीटरपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येईल, तसेच महापालिका, पोलीस, उत्पादन शुल्क यांसह विविध शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून १९ मार्चपासून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात १८ मार्च या दिवशी मुख्य शासकीय अधिकार्यांसमवेत बैठक पार पडली त्या वेळी ते बोलत होते.
या बैठकीनंतर पी. शिवशंकर यांनी अधिकार्यांच्या अडचणी समजून घेतल्या, तसेच कोरोनाविषयीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या व्यक्ती, मंगल कार्यालये, व्यापारी पेठांमध्ये कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी या वेळी दिले. कोरोनाच्या चाचण्यांसमवेतच अधिकाधिक लसीकरण व्हावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.