कोपरा किनगाव (जिल्हा लातूर) येथील सरपंचासह १६ जणांविरोधात गुन्हा नोंद
घरासमोरील देवीचे मंदिर आणि मूर्ती पाडण्यास विरोध करणार्या पीडित मुलीला मारहाण करून विनयभंग केल्याचे प्रकरण
लातूर – अहमदपूर तालुक्यातील कोपरा किनगाव येथे पीडित मुलीच्या घरासमोरील जागेत असलेले देवीचे मंदिर आणि मूर्ती पाडण्यास विरोध करणार्या पीडित मुलीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांसह १६ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याविषयी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १२ मार्च या दिवशी सरपंच गंगाधर डेपे, उपसरपंच बालाजी आचार्य यांच्यासह १६ जणांनी जेसीबीच्या साहाय्याने घरासमोरील जागेत असलेले देवीचे मंदिर, मूर्ती आणि पाटी पाडली. पीडित मुलीने ‘आमच्या जागेत हे काय करत आहात ? तुमच्याकडे कुणाचा आदेश आहे ते दाखवा’, असे सांगितले असता सरपंच गंगाधर डेपे यांनी तिला ‘तुला कसला आदेश दाखवायचा’, असे म्हणत हातातील काठीने ढकलून दिले, तसेच तिचा विनयभंग केला.