केरळ ब्राह्मण सभेने निषेध केल्यामुळे ‘पट्टरूडे मटण करी’ या लघुचित्रपटाचे नाव पालटले !
ब्राह्मणांचा अवमान करणारे नाव पालटण्यास भाग पाडणार्या केरळ ब्राह्मण सभेचे अभिनंदन !
कोची (केरळ) – केरळ ब्राह्मण सभेच्या सदस्यांनी संताप व्यक्त केल्यामुळे ‘पट्टरूडे मटण करी’ नावाच्या लघुचित्रपटाचे शीर्षक पालटून ‘मटण करी’ असे करण्यात आले आहे.
१. केरळ ब्राह्मण सभेचे प्रदेशाध्यक्ष करीमपुझा रामन एका जाहीर पत्रात नमूद केले आहे की, मल्ल्याळम् भाषेत ‘पट्टर’ हा शब्द ब्राह्मणांचा अवमान करण्यासाठी वापरला जातो. ब्राह्मण शाकाहारी आहेत, ही वस्तूस्थिती सर्वांनाच ठाऊक असूनही लघुचित्रपटाला ‘पट्टरूडे मटण करी’ हे शीर्षक देऊन ब्राह्मणांचा जाणीवपूर्वक अवमान करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
This film is a sheer insult to Hindus The film makers better change their title ..Kerala Brahmins Association takes offence to ‘Pattarude Mutton Curry’ short film title | The News Minute https://t.co/3RY9Po8tVm . @PrakashJavdekar @BJP4Keralam
— Shriraj Nair (@snshriraj) March 17, 2021
२. ‘लघुचित्रपटाच्या नावासह त्यातील आणखी काही भाग अवमानकारक आहे का किंवा तो ब्राह्मण समाजासाठी आक्षेपार्ह आहे का’, हे पडताळून पहाण्याचाही आमचा विचार आहे. तसे असल्यास आम्ही कथेत पालट घडवून आणण्यासाठीही बोलू, असे करीमपुझा रामन यांनी म्हटले आहे.
२. यु ट्यूब वर केलेल्या या चित्रपटाच्या विज्ञापनामध्ये सुधारित नाव (मटन करी) दिसत आहे. अर्जुन बाबू दिग्दर्शित हा लघुचित्रपट २० मार्च या दिवशी प्रदर्शित होत आहे.