विदिशा (मध्यप्रदेश) येथे धर्मांध वन माफियांकडून त्यांची तक्रार करणार्या हिंदूची ट्रक्टरखाली चिरडून हत्या !
भाजपच्या राज्यात अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! या प्रकरणाची मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गंभीर नोंद घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करून राज्यातील सर्वच वन माफियांच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे !
विदिशा (मध्यप्रदेश) – लटेरी तालुक्यातील मुरवास गावामध्ये धर्मांध वन माफियांनी संतराम वाल्मीकि नावाच्या व्यक्तीची ट्रकच्या खाली चिरडून हत्या केली. धर्मांध वन माफिया भ्रष्ट वनाधिकार्यांच्या साहाय्याने येथील सरकारी भूमीवर अतिक्रमण करत होते आणि संतराम वाल्मीकि त्यांच्या विरोधात आवाज उठवत होते. ते याविषयी प्रशासनाकडे तक्रार करत होते. यामुळेच फकीर महंमद, त्याची मुले इरफान, रिजवान, उमर फारूक आणि हिरो, शकील आदींनी भर बाजारात संतराम यांची हत्या केली, असे म्हटले जात आहे. या हत्येनंतर स्थानिक नागरिकांनी येथील आमदार उमाकांत शर्मा यांच्या नेतृत्वाखाली रस्ता बंद आंदोलन करत धर्मांध वन माफियांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली.
(सौजन्य : STN24 NEWS)
१. वन विभाग आणि वन विकास यांच्याकडून सहस्रो एकर भूमीवर सरकारी खर्चाद्वारे वनीकरण केले जात होते. वन माफियांकडून ही झाडे तोडून तेथे शेतीसाठी भूमी बनवण्यात येत होती. याची वर्ष २०१७ पासून संतराम प्रशासनकडे तक्रार करत होते. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडेही त्यांनी तक्रार केली होती; मात्र प्रशासन आणि सरकार यांच्याकडून याविरोधात कोणताही कारवाई करण्यात आली नाही. (तक्रार करूनही त्याची नोंद न घेणे, हे गंभीर असून दोषींवर काय कारवाई होणार ? – संपादक)
#Breaking | Sarpanch’s husband crushed to death in Vidisha, Madhya Pradesh. FIR against 6 people. Forest mafia under suspicion.
Details by Govind. pic.twitter.com/ITxJ6SOFb5
— TIMES NOW (@TimesNow) March 20, 2021
२. १० सप्टेंबर २०२०च्या तक्रारनंतर जिल्हाधिकार्यांनी कारवाईच्या नावाखाली निरपराध लोकांच्या भूमीवर जेसीबी चालवून त्यांची शेती नष्ट केली होती.