गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अचानक वाढ
१५४ नवीन रुग्ण, एकूण रुग्णसंख्या १ सहस्रजवळ
पणजी – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत २० मार्चला अचानकपणे वाढ झाली. कोरोनाविषयक एकूण १ सहस्र ७७२ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १५४ रुग्ण; म्हणजे ८.६ टक्के रुग्ण कोरोनाबाधित आढळले. यामुळे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ९९७ झाली आहे. २० मार्च या दिवशी ५६ रुग्ण कोरोनापासून बरे झाले. राज्यात सर्वाधिक म्हणजे १२८ कोरोनाबाधित रुग्ण पणजी येथे, तर मडगाव येथे ११२ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.