धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात यावा ! – शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेची मागणी
सिंधुदुर्ग – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आमिषाला बळी न पडता धर्मासाठी, स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलीदान दिले, हा महाराष्ट्राचा पराक्रमी इतिहास आहे; परंतु आज महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेला याविषयी माहिती नाही. त्यामुळे शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानावर धडा समाविष्ट करणे, ही काळाची आवश्यकता आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाची माहिती मुलांना शालेय जीवनातच मिळेल आणि विद्यार्थ्यांमधील धर्माभिमान अन् राष्ट्राभिमान जागृत होण्यास साहाय्य होईल, अशी मागणी ‘शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटने’च्या वतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आणि जिल्हा शिक्षण अन् प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.