६ नगरपालिकांमध्ये सरासरी ८४.६५ टक्के, तर पणजी महानगरपालिकेत ७०.३३ टक्के मतदान

पणजी – राज्यातील पेडणे, वाळपई, काणकोण, कुंंकळ्ळी, डिचोली आणि कुडचडे-काकोडा नगरपालिका यांच्या २० मार्च या दिवशी झालेल्या निवडणुकीत सरासरी ८४.६५ टक्के मतदान झाले, तर पणजी महानगरपालिकेत ७०.३३ टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

पेडणे नगरपालिकेत सर्वाधिक ९१.०२ टक्केे मतदान झाले, तर वाळपई पालिका ८५.५ टक्केे, काणकोण पालिका ८६.८८ टक्के, कुंकळ्ळी पालिका ७६.३५ टक्केे, डिचोली पालिका ८७.९६ टक्के आणि कुडचडे-काकोडा पालिका ८०.२४ टक्के मतदान झाले. नावेली जिल्हा पंचायतीसाठी एकूण ५७.५२ टक्के, विविध पंचायतींच्या एकूण १८ प्रभागांमध्ये सरासरी ८३.८ टक्केे आणि सांखळी नगरपालिकेच्या प्रभाग ९ साठी ८७.६७ टक्के मतदान झाले. मतदान सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत झाले. कोरोनाबाधित रुग्णांनी दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान केले.