आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर सिद्ध व्हा !
शारीरिक, मानसिक आदी स्तरांवरील सिद्धता करायच्याच आहेत. समजा आपण स्वतःच्या बळावर विविध सिद्धता पुष्कळ चांगल्या रितीने केल्या, उदा. जीवनावश्यक वस्तू खरेदी किंवा उपचारपद्धती शिकणे इत्यादी. तरी त्सुनामी, भूकंप अशा काही क्षणांत सहस्रो नागरिकांचा बळी घेणार्या महाभयंकर जीवघेण्या आपत्तींमध्ये आपल्याला कोण वाचवू शकतो, तर केवळ देवच ! ‘भगवंताने आपल्याला वाचवावे’, असे वाटत असेल, तर ‘तो आपल्यावर प्रसन्न होईल’, असे आपल्याला केले पाहिजे. महाभीषण आपत्तीतून वाचण्यासाठी भरवसा देवावरच ठेवावा लागतो. व्यक्तीने साधना करून देवाची कृपा प्राप्त केली, तर देव व्यक्तीचे कोणत्याही संकटात रक्षण करतोच. यासाठी आपल्याला देवाची उपासना करणे, देवाची भक्ती करणे, ईश्वरप्राप्तीसाठी साधना करणे यांसारखे प्रयत्न करावे लागतात ! थोडक्यात शारीरिक, मानसिक आदी स्तरांवरील सिद्धतांच्या जोडीलाच धर्माचरण आणि साधनाही करायला हवी !
आपत्काळाविषयीची अधिक माहिती वाचण्यासाठी पुढील संकेतस्थळांना भेट द्या !
आपत्काळाविषयीचे सनातनचे ग्रंथ
- आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिद्धता करा !
- आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सिद्धता करा !