‘एन्आयए’ला आणण्याची घाई करायला नको होती ! – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत
नाशिक – सचिन वाझे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘एन्आयए’ला आणण्याची घाई करायला नको होती, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आतंकवादविरोधी पथक सक्षम असतांना राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. एन्आयएकडे अन्वेषण गेल्याने राज्य सरकारला धक्का वगैरे बसलेला नाही. त्यांना जे अन्वेषण करायचे, ते करू दे. कुणीही आले आणि कोणत्याही पद्धतीने अन्वेषण केले, तरी सत्य बाहेर येईलच. ‘महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत’, असेही ते म्हणाले.