आपत्काळाच्या दृष्टीने आर्थिक नियोजन कसे करावे ?
शेअर्समधील गुंतवणुकीवर आताच उपाययोजना काढा !
‘शेअर्स’च्या गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण, तसेच सरकारचे नियंत्रणही नसते. त्यामुळे आपत्काळात ‘शेअर्समध्ये गुंतवलेले पैसे आपल्याला परत मिळतीलच’, याची निश्चिती देता येत नाही. यास्तव ज्यांनी ‘शेअर्स’मध्ये पैसे गुंतवले असतील, त्यांनी आतापासूनच उपाययोजना काढावी.
१. आपत्काळात निर्माण होणारी महागाई आणि कुटुंबियांची संख्या यांचा विचार करून साधारण काही वर्षे आपली आवश्यकता भागेल इतके धन घरामध्ये सुरक्षितपणे ठेवा !
२. घरासाठी विहीर खणणे, सौरऊर्जेची सोय करणे, लागवडीसाठी भूमी खरेदी, सोने इ. गुंतवणूक करू शकतो !
३. आपल्या पश्चात संपत्तीवरून नातेवाइकांत वादविवाद होऊ नयेत, यासाठी वयस्कर व्यक्तींनी मृत्यूपत्र करून ठेवा !
सध्याची मिळकत (उत्पन्न) आणि आतापर्यंतची बचत काटकसरीने वापरा !
त्यामुळे…
१. आपत्काळात होणार्या महागाईला तोंड देता येईल
२. आपत्काळात सामाजिक कर्तव्य म्हणून आपदग्रस्त बांधवांना अर्थसाहाय्य करता येईल.
३. आपत्काळात राष्ट्रकर्तव्य म्हणून राष्ट्रासाठी धन अर्पण करता येईल : दुसर्या महायुद्धाच्या वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आवाहन केल्यानंतर अनेकांनी आपले पैसे, अंगावरील अलंकार आदी ‘आझाद हिंद सेने’साठी नेताजींच्या झोळीत अर्पण केले होते. आपत्काळात राष्ट्रावरचा आर्थिक ताण पुष्कळ वाढतो, उदा. मोठ्या प्रमाणावर युद्धसाहित्याची निर्मिती करावी लागते. अशा वेळी राष्ट्रासाठी धन अर्पण करणे, हे राष्ट्रकर्तव्यच ठरते.
आपत्काळाच्या दृष्टीने या गोष्टी अवश्य करा !
|