आपत्काळाच्या दृष्टीने पुढील सिद्धताही करा !
१. घरात अनावश्यक असलेले साहित्य न्यून करण्यास आरंभ करा !
२. अन्न, पाणी, वीज, स्वयंपाकाचा ‘गॅस’ काटकसरीने वापरा !
३.‘रेंज’ची अडचण टाळण्यासाठी दोन वेगवेगळ्या आस्थापनांचे ‘सीम कार्ड’ असलेला भ्रमणभाष जवळ बाळगा !
४. आपत्काळात भ्रमणभाष चालेलच याची निश्चिती नसल्याने नातेवाईक, शेजारी, पोलीस ठाणे, अग्नीशमन दल आदी अत्यावश्यक ठिकाणचे दूरभाष क्रमांक, पत्ते आदी स्वतंत्र वहीतही नोंद करून ठेवा !
५. पूर, भूकंप, आग आदी प्रसंगी काही मिनिटांतच घराबाहेर पडावे लागणार असल्यास पूर्वसिद्धता म्हणून एखाद्या लहान पेटीमध्ये (‘ब्रीफकेस’मध्ये) महत्त्वाची कागदपत्रे (उदा. शिधापत्रिका, आधारकार्ड, बँक पासबूक) आणि अन्य आवश्यक साहित्य एकत्रित करून ठेवा !
६. साबण, दंतमंजन आदी वस्तूंना असणार्या पर्यायांचाही विचार करून ठेवा; उदा. यात कपडे धुण्यासाठी रिठे, भांडी घासण्यासाठी राख, गायीच्या शेणीचे दंतमंजन इत्यादी
७. घरातील उपकरणे (स्वयंपाकघरातील आवश्यक उपकरणे उदा. घरघंटी, विद्युत उपकरणे, विजेरी इत्यादी) सायकल, बैलगाडी आदींच्या दुरुस्तीसाठी लागणारे सुटे भाग घेऊन ठेवा !
८. घरातील उपकरणे, नळ, सायकल, बैलगाडी आदी वस्तूंची दुरुस्ती शिकून घ्या !
९. युद्धकाळात इंधन उपलब्ध होणार नाही, यासाठी ते वेळीच साठवून ठेवा !
१०. दूरचित्रवाणीचे (‘टी.व्ही’चे) प्रक्षेपण बंद पडल्यास आकाशवाणीवरून देण्यात येणार्या सूचना, वृत्ते आदी ऐकण्यासाठी ‘रेडिओ’ घेऊन ठेवा ! : भ्रमणभाषमध्ये ‘रेडिओ’ असतो, तोही चालू शकतो.
११. ज्यांना शक्य आहे त्यांनी गावांत घराच्या रक्षणासाठी कुत्रा, दुधासाठी गायी, शेती आणि बैलगाडी यांसाठी बैल, प्रवासासाठी घोडे इत्यादी पाळा ! या प्राण्यांचा सांभाळ, त्यांच्या विकारांवर उपाय यांचीही माहिती घ्या.
१२. भावी आपत्काळात उपयुक्त होतील, अशा काही वा कृती आताच शिकून घ्या किंवा करण्याचा सराव ठेवा; उदा. शिवणयंत्रावर कपडे शिवणे, पोहणे, बैलगाडी चालवणे, घोड्यावर बसणे.
१३. गृहनिर्माण संस्था (हाऊसिंग सोसायटी), अपार्टमेंट आदी ठिकाणी रहाणार्यांनी एकत्रितपणे पुढील सोयी करून घ्या, उदा. यात ‘बायो-गॅस’ संयंत्र उभारणे, विहीर खणणे, सौरऊर्जेची सोय करणे इत्यादी