बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची संपत्ती ५ वर्षांत १ लाखाहून थेट ४१ लाखांवर पोचली !
असा ‘चमत्कार’ भारतात राजकारण्यांच्या संदर्भात नेहमीच होत असतो आणि जनतेलाही ते अपेक्षित असते ! जर असे झाले नाही, तर ते आश्चर्यच ठरते ! असे ‘चमत्कार’ रोखण्यासाठी धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था हवी !
कोलकाता (बंगाल) – असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (‘ए.डी.आर्.’ने) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या एका आमदाराची संपत्ती ५ वर्षांत १ सहस्र ९८५ टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे. तृणमूल काँग्रेसच्या आमदार ज्योत्स्ना मंडी यांनी निवडणूक आयोगाकडे प्रविष्ट केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार वर्ष २०१६ मध्ये त्यांची एकूण संपत्ती १ लाख ९६ सहस्र ६३३ रुपये इतकी होती. वर्ष २०२१ मध्ये ही संपत्ती ३९ लाख ४ सहस्र ५११ रुपये इतकी वाढून ती ४१ लाख १ सहस्र १४४ वर पोचली.
The assets of sitting TMC MLA Jyotsna Mandi have increased by 1985.68% in five years#WestBengalElections2021 https://t.co/wTJYKo5ulD
— IndiaToday (@IndiaToday) March 20, 2021
२७ मार्चला होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानामधील ३० उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राचे एकत्रित सर्वेक्षण करण्यात आले. या वेळी वर्ष २०१६ मध्ये पुरुलियामधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढून विजय मिळवणारे आणि सध्या भाजपमध्ये प्रवेश करणारे संदीपकुमार मुखर्जी यांची संपत्ती २८८.८६ टक्क्यांनी वाढल्याचे सांगण्यात आले आहे. मुखर्जी यांनी ५ वर्षांपूर्वी त्यांची एकूण संपत्ती ११ लाख ५७ सहस्र ९४५ इतकी असल्याचे सांगितले होते. ही संपत्ती २०२१ मध्ये ४५ लाख २ सहस्र ७८२ इतकी झाली आहे. अनेक उमेदवारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.