नेटफ्लिक्सवर ३० मिनिटे व्हिडिओ बघण्याने ६ किलोमीटर वाहन चालवण्याएवढे प्रदूषण निर्माण होते !
ओटीटी अॅप्सच्या आहारी गेलेल्या भारतियांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
नवी देहली – युनायटेड किंग्डममधील प्रतिष्ठित रॉयल सोसायटीच्या वैज्ञानिकांच्या अहवालानुसार ‘नेटफ्लिक्स’वर १ घंटा मालिका पाहिल्यास त्याचा परिणाम थेट ग्रहांवर होतो. एखादे चारचाकी वाहन साधारणतः ६ किलोमीटर चालवल्यावर त्यातून जेवढ्या प्रमाणात प्रदूषण होते, तेवढे प्रदूषण नेटफ्लिक्सवर ३० मिनिटे एखादी मालिका पाहिल्याने होते, असे संशोधनात म्हटले आहे.
Watching Netflix for 30 mins harms planet as much as driving 6 kms, finds green report
https://t.co/QQP3rDC14j— IndiaTodayTech (@IndiaTodayTech) March 18, 2021
नेटफ्लिक्सने हा दावा फेटाळला आहे.
वाचा संपादकीय : ‘नेटफ्लिक्स’चे दुष्परिणाम !