कृतज्ञतेने हे मन भरूनी आले ।
नामजप करतांना प्रार्थना केल्यावर साधिकेला सुचलेले काव्यपुष्प
एकदा माझे नामजपाकडे नीट लक्ष लागत नव्हते. ‘कसा भाव ठेवू ?’, हेही कळत नव्हते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर त्यांच्या कृपेने सुचलेली कविता पुढे दिली आहे.
परम पूज्य गुरुदेव, वायूही तुम्हीच, जलही तुम्हीच ।
आकाशही तुम्हीच आणि अग्नीही तुम्हीच ॥ १ ॥
सूर्यही तुम्हीच आणि पृथ्वीही तुम्हीच ।
चंद्रही तुम्हीच आणि सर्व ग्रह-तारेही तुम्हीच ॥ २ ॥
तुमच्याच अस्तित्वाने व्यापली ही अवघी सृष्टी ।
या पामराचे डोळे मात्र तुम्हाला शोधत बसती ॥ ३ ॥
तुम्हाला मी बाहेर शोधत बसते ।
मात्र तुमची हाक आतूनच ऐकू येते ॥ ४ ॥
तुमची हाक कानावर पडताच ।
डोळ्यांतून पश्चात्तापाचे अश्रू वहाती ॥ ५ ॥
त्या अश्रूंसमवेत सर्व त्रास आणि विकल्प निघूनी जाती ।
साधनेचे प्रयत्न करण्या पुन्हा प्रोत्साहन देती ॥ ६ ॥
प.पू. गुरुदेव, तुमचे कोमल चरण पुन्हा दिसले ।
कृतज्ञतेने हे मन भरूनी आले ।
घ्या हो गुरुदेव, या जिवाला तुमच्याजवळ उचलूनी घ्या ।
तुमच्या कृपेस पात्र होण्या, माझ्याकडून प्रयत्न होऊ द्या ॥ ७ ॥
– सौ. राजलक्ष्मी जेरे, सॅन डिएगो, अमेरिका. (३.३.२०२०)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |