कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावामध्ये ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांचा उल्लेख टाळू नका !
अखिल भारतीय वीरशैव महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदीप चाकोते यांची मागणी
सोलापूर – श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती हे अधिकृत नाव आहे. शासकीय स्तरावर हीच नोंद आहे. तरीही दैनंदिन व्यवहारात बाजार समितीचा उल्लेख करण्यात येतो. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांचा उल्लेख टाळू नका, अशी मागणी अखिल भारतीय वीरशैव महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी केली आहे. बाजार समितीचे सचिव अंबादास बिराजदार यांना हे निवेदन देण्यात आले.
दैनंदिन व्यवहार, फलक, तसेच पोर्टलवर ‘श्री सिद्धेश्वर’ हा उल्लेख करण्यासमवेतच बाजार समितीचे रजिस्टर, पावती पुस्तके, व्यापार्यांना देण्यात येणारे परवाने आदींवरही ‘श्री सिद्धेश्वर’ या नावाचा उल्लेख असायला हवा, असे निवेदनात म्हटले आहे.