अधिकोषांच्या गोपनीय डाटा चोरीप्रकरणात पुणे येथे ९ जणांना अटक !
पुणे – अधिकोषांमध्ये असलेल्या निष्क्रीय खात्यांचा (डोरमंट अकाऊंट) गोपनीय विदा (डाटा) अवैध मिळवून त्याद्वारे अब्जावधी रुपयांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंतरराज्य टोळीला सायबर गुन्हे शाखेने पकडले आहे. आरोपींनी संगनमत करून माहिती मिळवलेल्या अधिकोषांमधील निष्क्रीय खात्यामध्ये (डोरमंट अकाऊंट) २ अब्ज १६ कोटी २९ लाख ३४ सहस्र २४० रुपये एवढी रक्कम होती. या प्रकरणी रोहन मंकणी, रवींद्र माशाळकर यांच्यासह ७ जणांना अटक करण्यात आली असून त्यात ४ संगणक अभियंत्यांचा समावेश आहे.
2 former channel operators held in bank data theft case https://t.co/SRfRAazr0t
— TOI Pune (@TOIPune) March 17, 2021
आरोपी रोहन मंकणी यांना विदा विक्री करून त्याबदल्यात त्यांच्याकडून मोठी रक्कम मिळवणार होते, अशी माहिती सायबर गुन्हे शाखेला मिळाली होती. सिंहगड रस्त्यावरील सुधीर भटेवरा यांच्याकडून पैसे घेण्यासाठी आरोपी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपींना पकडण्यात आले. आरोपींकडून २५ लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.