मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीन ! – हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त, मुंबई

हेमंत नगराळे

मुंबई – मुंबई पोलीस सध्या एका कठीण समस्येतून जात आहेत. ती समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी नियुक्ती केली आहे. येत्या काळात मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीन.

सध्या जी प्रकरणे मुंबई पोलिसांपुढे आहेत, त्यांचे अन्वेषण योग्य रितीने होईल. दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे वक्तव्य मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केले. १७ मार्च या दिवशी मुंबई पोलीस आयुक्तपदाचे दायित्व स्वीकारल्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली.