पुण्यातील शिवाजी मार्केटला लागलेल्या आगीत २५ दुकाने जळून खाक !

कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केट

पुणे – येथील कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला १६ मार्च या दिवशी पहाटे चार वाजता भीषण आग लागली होती. या मार्केटमध्ये मटण आणि चिकन यांची दुकाने आहेत. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून खाक झाली आहेत. त्यानंतर १ घंट्यांच्या अथक प्रयत्नानंतर अग्नीशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने आगीत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही; पण दुकानात असणार्‍या कोंबड्या आणि बकर्‍या यांचा मात्र जळून मृत्यू झाला आहे. आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी आल्या होत्या; मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण समजू शकलेले नाही.