(म्हणे) ‘उत्तरप्रदेशात भाजप सत्तेत आल्यापासून पोलीस चकमकीत मारले गेलेल्यांपैकी ३७ टक्के मुसलमान !’
असदुद्दीन ओवैसी यांचा मुसलमानांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप
* जर ओवैसी यांनी दिलेली आकडेवारी खरी असेल, तर इतक्या मोठ्या संख्येने मुसलमान गुन्हेगारी कृत्यात सहभागी होते, हेच सिद्ध होते; कारण आतापर्यंत या चकमकीवरून पोलिसांवर कुणीही आक्षेप घेतलेला नाही कि गुन्हा नोंदवण्यात आल्याचे ऐकिवात नाही. देशातील लोकसंख्येचा विचार करता अल्पसंख्यांकांची गुन्हेगारीत किती टक्केवारी आहे, याचाही शोध ओवैसी यांनी घेतला पाहिजे !
* जिहादी आतंकवादी कोणत्या धर्माचे असतात, हे सार्या जगाला ठाऊक आहे, आणि तेच चकमकीत ठार होतात, हेही तितकेच सत्य आहे. आता तेही ओवैसी नाकारणार आहेत का ?
बलरामपूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार आल्यापासून मुसलमानांवर होणार्या अन्यायात वाढ झालेली पहायला मिळत आहे. वर्ष २०१७ ते २०२० या कालावधीत उत्तरप्रदेशमध्ये झालेल्या पोलीस चकमकीमध्ये मारल्या गेलेल्या एकूण लोकांपैकी ३७ टक्के मुसलमान होते. हा अन्याय का केला जात आहे, असा प्रश्न विचारत एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजप सरकारवर आरोप केला आहे. ‘या सरकारच्या अनेक नीती मुसलमानविरोधी आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत योगी सरकार पुन्हा बनणार नाही’, असा दावा त्यांनी केला. (मुसलमानांची मते मिळवण्यासाठीच ओवैसी अशा प्रकारची विधाने करत आहेत, हे लहान मूलही सांगील ! – संपादक)
ओवैसी यांनी मुसलमानांना ‘बॅरिस्टर’ होण्याचा सल्ला द्यावा, गुन्हेगार नाही ! – उत्तरप्रदेशचे मंत्री मोहसीन रजा
ओवैसी यांनी केलेल्या टीकेवर उत्तरप्रदेश सरकारमधील मंत्री मोहसीन रजा यांनी उत्तर देतांना म्हटले की, ओवैसी यांनी मुसलमानांना बॅरिस्टर होण्याचा सल्ला द्यावा, गुन्हेगार नाही. गुन्हेगारीमध्ये मुसलमानांची इतकी अधिक टक्केवारी का असते, याविषयीही समाजाला मार्गदर्शन करावे. ओवैसी यांचे पूर्वज देशाचे विभाजन करणारे आहेत. ‘ओवैसी यांची भूमिका विभाजनवादी आहे’, असा आरोपही रजा यांनी केला.