उदबत्ती आणि कापूर यांचे मानस उपाय करतांना आलेल्या अनुभूती

सौ. गौरी खिलारे

१. उदबत्तीने मानस उपाय करतांना आलेल्या अनुभूती

१ अ. उदबत्तीच्या मानस उपायांनी त्रासदायक शक्ती अधिक प्रमाणात शरिराबाहेर पडणे : ‘१२.५.२०२० या दिवशी मी उदबत्तीने मानस उपाय करत होते. तेव्हा आपण प्रत्यक्ष उदबत्तीने उपाय करतो, त्यापेक्षा मानस उपायांनी माझ्या शरिरातून त्रासदायक शक्ती अधिक प्रमाणात बाहेर पडत होती.

१ आ. ‘उदबत्ती सजीव होऊन देहावरील आवरण काढत आहे’, असे वाटून भावजागृती होणे : काही वेळाने मी हातात धरलेली मानस उदबत्ती सजीव होऊन माझ्या शरिरावरील त्रासदायक आवरण काढू लागली. त्या वेळी माझा भाव जागृत होऊन कृतज्ञतेने माझ्या डोळ्यांत अश्रू आले.

१ इ. प्रत्यक्ष उदबत्ती लावलेली नसतांना उदबत्तीचा धूर सूक्ष्मातून दिसणे आणि उदबत्ती करत असलेल्या साहाय्यासाठी तिच्याप्रती कृतज्ञताभाव निर्माण होणे : या आधीही ४ – ५ वेळा मी डोळे झाकून नामजप करतांना प्रत्यक्ष उदबत्ती लावलेली नसूनही मला सूक्ष्मातून उदबत्तीचा धूर माझ्या समोर दिसला होता. त्याची मला या वेळी आठवण आली आणि उदबत्तीदेवता साधकांना साधनेत करत असलेल्या साहाय्याची जाणीव होऊन तिच्याप्रती कृतज्ञतेचा भाव निर्माण झाला.

२. कापराचे मानस उपाय करतांना

अ. मी कापराचे मानस उपाय करत असतांना माझ्या पेशीपेशीमध्ये चैतन्य पोचत असल्याचे मला जाणवले.

आ. ‘कापूर सजीव होऊन माझ्यासमोर उभा आहे आणि त्याचा देह पांढरा शुभ्र आहे’, असे मला जाणवले.’

– सौ. गौरी खिलारे, सांगली (१५.५.२०२०)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक