राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचार्यांचा २ दिवस संप
कणकवली येथे बँक कर्मचार्यांनी केला शासनाच्या धोरणाचा निषेध
कणकवली – युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या संघटनेच्या नेतृत्वाखाली देशातील बँक कर्मचार्यांनी बँकांच्या खासगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी १५ आणि १६ मार्च हे दोन दिवस कामबंद आदोलन केले. या पार्श्वभूमीवर १६ मार्चला कणकवली येथील बँक ऑफ महाराष्ट शाखेच्या समोर बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी आंदोलन केले. या वेळी शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
या वेळी संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणामुळे ग्रामीण भागातील बँकांची सुविधा अल्प करणे, शेतीला अल्प प्रमाणात कर्ज देणे, बेरोजगारांना अल्प कर्ज देणे, छोटे उद्योग आणि व्यापार यांना अल्प कर्ज देणे आदी धोरणे राबवली जातील. बँकांच्या खासगीकरणामुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांना न्यूनतम कर्ज दिले जाईल. बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, अशा अनेक समस्या निर्माण होतील. यासाठी देशातील सर्वसामान्य जनतेने आवाज उठवला पाहिजे.