गोव्यात दिवसभरात ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू
गेल्या २ मासांत दिवसभरातील सर्वाधिक मृत्यू
पणजी – गोव्यात १६ मार्चला २४ घंट्यांत ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंतच्या एकूण मृत्यूंची संख्या ८११ झाली आहे. दिवसभरात १ सहस्र ५६६ चाचण्या करण्यात आल्या. त्यांपैकी ९४ जण कोरोनाबाधित आढळले, तर ७३ जण कोरोनामुक्त झाले. यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या वाढून ७९२ झाली आहे.