कुंभमेळ्यासाठी बनवलेली १ सहस्र शौचालये आगीत जळून खाक; प्रशासनाकडून चौकशीचे आदेश
हरिद्वार – कुंभमेळ्यासाठी बनवण्यात आलेली प्लास्टिक आणि फायबरशीटची १ सहस्र शौचालये आगीत जळून खाक झाली. अग्नीशमन दलाच्या ८ गाड्यांद्वारे ही आग विझवण्यात आली. भेल फाऊंड्री दरवाजाजवळील मैदानामध्ये ही शौचालये बनवण्यात येत होती. १० मार्चला यातील एका शौचालयाला अचानक आग लागली आणि सर्व शौचालये जळली. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.