परात्पर गुरु डॉक्टरांनी वाद्य वाजवल्यावर मोठ्या अनिष्ट शक्तींना त्रास होऊन त्या पळून जाणार असणे आणि साधकांना बोलावण्यासाठी ते बासरी वाजवणार असणे

कु. तृप्ती कुलकर्णी

‘३०.१०.२०१९ या दिवशी झालेल्या संगीत प्रयोगात मिरज येथील श्री. संतोष दाभाडे उपाख्य माऊली यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधनासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात तबलावादन केले. त्याचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात आला. तेव्हा काही साधकांच्या मनात विचार आला, ‘माऊली यांच्या तबलावादनाने मोठ्या अनिष्ट शक्तींना पुष्कळ त्रास होतो, तर साक्षात् परात्पर गुरु डॉक्टरांनी एखादे वाद्य वाजवले, तर अनिष्ट शक्ती कायमस्वरूपीच पळून जातील.’ हे सूत्र मी पू. होनपकाकांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘हो. परात्पर गुरु डॉक्टरांनी एखादे वाद्य वाजवल्यावर अनिष्ट शक्ती कायमस्वरूपीच पळून जातील आणि मग साधकांना बोलावण्यासाठी ते बासरी वाजवतील.’’

– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१०.२०१९)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक