प्रतिदिन शुभ कार्यासाठी कोणती वेळ वर्ज्य करावी (टाळावी)?
‘प्रतिदिन शुभ कार्यासाठी राहूकाळ वर्ज्य करावा. प्रतिदिन ९० मिनिटे म्हणजे १ घंटा ३० मिनिटे राहूकाळ असतो. राहूकाळात कोणतेही शुभ काम करू नये, तसेच महत्त्वाच्या कामासाठी प्रवासाचा आरंभ करू नये. राहूकाळाचा कालावधी प्रवास, प्रयाण, नवीन व्यवहार, सरकारी कामे, महत्त्वाच्या गाठीभेटी इत्यादी कामांसाठी वर्ज्य करावा. विवाहादी मंगल कार्यासाठी राहूकाळ वर्ज्य नाही. राहूच्या अशुभ काळात त्रास होत असल्यास उपास्यदेवतेचा जप करावा.
‘प्रत्येक वारी राहूचा अशुभ कालावधी कोणत्या वेळी असतो ?’, हे पुढे दिले आहे.
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (९.३.२०२१)
साधकांनी संतांचे पुढील वचन लक्षात ठेवावे.तुका म्हणे हरिच्या दासा । अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’ ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’ |