अर्णव गोस्वामी आणि ए.आर्.जी. मीडियाचे कर्मचारी यांचे अटकेपासूनचे संरक्षण न्यायालयाकडून कायम
टी.आर्.पी. घोटाळा प्रकरण
मुंबई – टी.आर्.पी. घोटाळ्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेले रिपब्लिक टी.व्ही.चे संपादक अर्णव गोस्वामी आणि ए.आर्.जी. मीडियाचे कर्मचारी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलेले अंतरिम संरक्षण कायम ठेवले आहे. न्यायमूर्ती एस्.एस्. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपिठापुढे १५ मार्च या दिवशी ही सुनावणी झाली. या प्रकरणात पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रहित करावा, यासाठी अर्णव गोस्वामी यांसह ए.आर्.जी. मीडिया समूह यांनी न्यायालयात याचिका केली आहे.