महाराष्ट्र पोलीस दलावरील अविश्वास चुकीचा ! – शंभूराज देसाई
सातारा, १६ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर शासनाचा कोणत्याही प्रकारचा दबाव नसतो. त्यांना काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य महाआघाडी सरकारने दिले आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाचा तपास आम्ही ए.टी.एस्. कडे सोपवला होता; मात्र अचानक एन्.आय.ए. ने तपासात उडी घेत राज्यशासनावर अविश्वास दाखवला आहे. यामुळे राज्यशासन मागे सरकलेले नाही. महाराष्ट्र पोलीस दलावर असा अविश्वास दाखवणे चुकीचे असून त्यांचे काम चांगलेच आहे, असा विश्वास गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे. ते पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेढा पोलिसांच्या गौरव सोहळ्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते.