शरद पवार यांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग

मुंबई – पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून करण्यात आलेल्या अटकेवरून विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षावर आरोप करण्यात येत आहेत. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. १५ मार्च या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ‘वर्षा’ या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची १ घंटा चर्चा झाली. या वेळी नेमकी कोणती चर्चा झाली हे समजलेले नाही. शरद पवार यांच्या भेटीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आणि त्यानंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे अन् परिवहनमंत्री अनिल परब या शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुन्हे अन्वेषण शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारंबे आणि त्यानंतर विश्‍वास नागरे-पाटील यांच्याशी यांनी चर्चा केली.