वीजजोडणी तोडल्यामुळे सातारा जिल्ह्यात शिवसेना आक्रमक !
सातारा, १५ मार्च (वार्ता.) – खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे वीजजोडणी तोडण्यासाठी आलेल्या वाहनाच्या काचा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी फोडल्या. ऐन उन्हाळ्यामध्ये पिकांना पाण्याची आवश्यकता असतांना वीजजोडणी तोडण्याचे काम महावितरणने हाती घेतले आहे. वरिष्ठांनी थकबाकीदारांची वीजजोडणी तोडण्याचे आदेश दिल्यामुळे स्थानिक कर्मचारी हतबल झाले आहेत. त्यामुळे त्यांना शेतकरी आणि आक्रमक शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.