सातारा येथील यवतेश्वर-कास रस्त्यावर सापडली मानवी कवटी आणि अस्थी !
सातारा – येथील यवतेश्वर-कास रस्त्यावरील यवतेश्वर घाटात मानवी कवटी, अस्थी तसेच जळालेल्या अवस्थेत पादत्राणे सापडली आहेत. यामुळे यवतेश्वर परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यवतेश्वर घाटात मानवी हाडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निर्जनस्थळी मानवी कवटी, अस्थी आणि इतर वस्तू पोलिसांना आढळून आल्या आहेत. परिसरात अनेक ठिकाणी राख दिसत असून तेथे वणवा लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.