क्रांतीवीर चापेकर बंधू यांच्याविषयी अवमानकारक पोस्ट टाकल्याने तक्रार नोंद !
पुणे – चापेकर यांचा स्वातंत्र्यलढ्याशी काहीही संबंध नव्हता, ते धर्मांध अतिरेकी होते, अशी अवमानकारक माहिती क्रांतीवीर चापेकर बंधू यांच्याविषयी फेसबूकवर एका पोस्टमध्ये माधव खरे आणि दिलीप चव्हाण या दोघांनी लिहिली आहे. त्यामुळे भाजप नगरसेवक अधिवक्ता मोरेश्वर शेडगे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. यावर विविध संघटना, संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या घटनेचा निषेध करून कडक कारवाईची मागणी केली आहे. (पोलिसांनी तत्परतेने अशा समाजकंटकावर कारवाई केली पाहिजे. – संपादक)