श्रीरामकृष्ण बोधामृत

१. ईश्‍वर असून सर्व कर्तृत्व त्याचेच आहे, हे सत्य जाणून संपूर्ण शरणागती पत्करावी, हेच मनुष्यास योग्य आणि हितकारक आहे; म्हणून हेच आचरणात आणावे. हाच मनुष्यजन्माचा उद्देश आहे.

२. सर्वच मार्गांनी ईश्‍वर लाभ शक्य आहे. गच्चीवर चढण्याशी काम. पक्क्या जिन्याने जा, शिडीने जा, दोरीने जा, नाहीतर गाठाळ बांबूने जा.

३. नुसती फिलॉसॉफी (तत्त्वज्ञान) म्हणजे शुद्ध लाकडे फोडणे. नुसती विचारांची कचाकची (देवाण-घेवाण) अशाने लाभ कधीच व्हायचा नाही.

(संदर्भ : मासिक ‘कल्याणी’, वर्ष २०१६)