सचिन वाझे यांची अटक अवैध असल्याची त्यांच्या भावाची न्यायालयात याचिका
मुंबई – मुकेश अंबांनी यांच्या निवासाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या असलेल्या गाडीच्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने सचिन वाझे यांना केलेली अटक अवैध आहे, अशी याचिका त्यांचे बंधू सुधर्म वाझे यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.
सचिन वाझे यांना न्यायालयात उपस्थित करण्याचा आदेश राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला द्यावा, अशी मागणी सुधर्म वाझे यांनी याचिकेत केली आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांना हाताशी धरून आणि त्यांचा वापर करून राजकीय क्षेत्रातील काही प्रभावी नेत्यांनी सचिन वाझे यांना बळीचा बकरा बनवले आहे, असा आरोपही सुधर्म वाझे यांनी याचिकेत केला आहे.