कोरोनाच्या संसर्गामुळे रात्री १० नंतर संचारबंदी असूनही पुण्यातील पब चालू !
पब चालू ठेवणारे, तसेच त्यावर अंकुश नसणारे कामचुकार आणि भ्रष्ट पोलीस दोघेही शिक्षेस पात्र आहेत. अशांवर लवकरात लवकर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !
पुणे – राज्यात आणि पुण्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांना बाहेर फिरण्यास रात्री १० नंतर संचार बंदी लागू करण्यात आली आहे; मात्र पुणे रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूस राजा बहादुर मिलमधील हॉटेल आणि पब, मुंढवामधील कल्ट हाऊस पब कोरोनाचे कोणतेही नियम न पाळता मध्यरात्री २ वाजेपर्यंत चालू आहेत. रस्त्यावरून जाणार्या नागरिकांवर मास्कची कारवाई केली जात आहे; मात्र त्याच वेळी पबवाल्यांना सूट दिली जात आहे. याकडे स्थानिक पोलीस प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे. कुणी दुर्लक्ष केल्यामुळे मध्यरात्रीपर्यंत पब चालू आहेत ? गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारणारे पोलीस आयुक्त पबचालकांवर गुन्हे नोंद करणार का ? पोलीस आयुक्त स्थानिक पोलिसांवर कारवाई करणार का ? असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहेत.