पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात भरती
मुंबई – मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अटक केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पदावरून निलंबित करण्यात आले आहे. त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे उपचारांसाठी जे.जे. रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची आरोग्य पडताळणी करण्यात येणार आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या प्रकरणात विधीमंडळात विरोधी पक्षाकडून त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली होती. यानंतर वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने १३ मार्चच्या रात्री त्यांना अटक केली. वाझे २५ मार्चपर्यंत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कोठडीत आहेत.