अंबानी यांच्या कुटुंबासाठी भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभेचा दुरुपयोग केला ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
मुंबई – भाजपकडून महाराष्ट्राची अपकीर्ती करण्याचा उद्योग चालू आहे. अंबानी यांच्या कुटुंबासाठी भाजपने विधानसभेचा दुरुपयोग केला, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेेशाध्यक्ष नाना पटोले यांनी १४ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत केला.
या वेळी नाना पटोले म्हणाले, ‘‘अंबानी यांच्या कुटुंबाला झेड प्लस दर्जाच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या घरावर हेलिकॉप्टरला अनुमती मिळावी, यासाठी भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभेचा दुरुपयोग केला. महाराष्ट्र सरकारची अपकीर्ती करण्यासाठी सचिन वाझे यांना खलनायक ठरवण्याचे काम भाजपकडून करण्यात आले आहे. या प्रकरणात त्यांना अडकवण्यात आले आहे.’’