‘म्हातारपण’ या देवाच्याच नियोजनाची व्यष्टी आणि समष्टी साधना यांच्या दृष्टीने लक्षात आलेली वैशिष्ट्ये

‘म्हातारपण’ हे देवाचे सुंदर नियोजन !’ हे गुरुदेवांचे वाक्य वाचले आणि त्यांनीच पूर्वी याविषयी सुचवलेले विचार आठवले. त्यांच्याच कृपेने हे लिहून देण्याची बुद्धी झाली.

श्री. प्रसाद हळदणकर

१. व्यष्टी स्तरावर

अ. ‘आपण आतापर्यंत मिळवलेल्या संपत्तीवरील आपला अधिकार न्यून होऊ लागतो. ‘मी आणि माझे या विचाराने मिळवलेल्या सर्व गोष्टींवरील आपला अधिकार न्यून होऊ लागतो’, हे लक्षात येते अन् ‘देवच सर्वकाही आहे’, याची जाणीव होऊ लागते.

आ. आजपर्यंत ज्या देहाच्या आधारावर आपण सर्वकाही साधले, त्या देहावरचे नियंत्रण गमावू लागतो.

इ. मी या देहाची निगा राखली आणि आयुष्यभर त्याची लाज राखली, तो आता पराधीन झाला आहे. तो इतका पराधीन झाला आहे की, त्याची शुश्रुषा इतरांना करावी लागते आणि ते आपल्याला निर्विकल्पपणे स्वीकारावे लागते. त्यामुळे आपला अहं वेगाने अल्प होऊ लागतो आणि प्रगती चालू होते.

२. समष्टी स्तरावर

अ. नातेवाईक आणि घरच्यांना ‘आतापर्यंत आपल्याला आधार देणारी व्यक्तीही चिरकाल राहू शकत नाही. आपल्या समवेत नेहमी ईश्‍वरच असणार आहे’, याची जाणीव होते आणि ‘या नश्‍वर देहाची आसक्ती अल्प केली पाहिजे’, हे लक्षात येते.

आ. म्हातार्‍या व्यक्तींचे सर्व स्वीकारून शुश्रुषा करावी लागते. त्यामुळे सेवा करणार्‍यांचा अहं जलद अल्प होतो.

इ. ‘घरातील पाल्यांवर मोठ्यांची आणि आजारी असणार्‍यांची सेवा केली पाहिजे’, याचा संस्कार होतो.’

– श्री. प्रसाद हळदणकर, बेळगाव (२७.३.२०१८)