अॅमेझॉनकडून अंतवस्त्रे आणि पायपुसण्या यांवर श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजाचे चित्र !
|
|
कोलंबो (श्रीलंका) – ऑनलाईन साहित्य विक्री करणार्या अॅमेझॉनकडून महिला आणि पुरुष यांची अंतवस्त्रे, पायपुसण्या यांची विक्री करतांना त्यावर श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजाचे चित्र प्रसिद्ध केल्याने श्रीलंकेने ही उत्पादने तात्काळ हटवण्यास सांगितले आहे. या साहित्याचे उत्पादन चिनी आस्थापनाकडून होत आहे. त्यामुळे श्रीलंकेने चीन सरकारकडेही हे सूत्र उपस्थित केले आहे. वॉशिंग्टन येथील श्रीलंकेच्या दूतावासाने अमेरिकेच्या सरकारकडेही याची तक्रार केली आहे.
China made ‘#doormats‘ with #SriLankan flag being sold on #Amazon; kicks up political storm https://t.co/cT0J8y6rvR via @BT_India
— Business Today (@BT_India) March 13, 2021
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक)
या संदर्भात श्रीलंकेतील काही लोकांनी सामाजिक माध्यमांतून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एकाने लिहिले आहे, ‘अशा घटनांतून चीन श्रीलंकेकडे कोणत्या दृष्टीने पहातो, हे लक्षात येते.’ दुसर्याने लिहिले आहे की, जर आपण (श्रीलंकेने) चीनचे कर्ज चुकवले नाही, तर तो आपल्या राष्ट्रीय ध्वजाला टॉयलेट पेपरवरही प्रसिद्ध करू शकतो.