वर्षाला ६ सिलिंडर विनामूल्य आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन !
तमिळनाडूतील सत्ताधारी अण्णाद्रमुकचे निवडणूक घोषणापत्र प्रसिद्ध
जनतेला लाच देऊन सत्ता मिळवणारे राजकीय पक्ष स्वतःच्या खिशातील नाही, तर जनतेचेच पैसे उधळत आहेत, हे लक्षात घ्या !
चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाने घोषणापत्र प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी पुन्हा सत्तेत आल्यास राज्यातील प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ६ सिलिंडर विनामूल्य देण्यात येतील. कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाईल. वृद्धांना देण्यात येणार्या पेन्शनमध्ये दुप्पट वाढ केली जाईल. विद्यार्थ्यांनी घेतलेले शैक्षणिक कर्ज माफ केले जाईल आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २ जीबी डेटा विनामूल्य देण्यात येईल, अशी आश्वासने दिली आहेत. याखेरीज नववी, दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही माध्यान्ह आहार चालू करण्यात येईल, असे म्हटले आहे.