बेळगावमधील मराठी भाषिकांवरील अन्यायाच्या विरोधात सावंतवाडीत उद्या धरणे आंदोलन
सावंतवाडी – कर्नाटक राज्यात बेळगाव येथे मराठी भाषिकांना वारंवार अन्याय सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असतांना कन्नड भाषिकांनी चालवलेली मनमानी आणि अरेरावी आम्ही सहन करणार नाही. मराठी भाषिकांवर झालेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ शहरातील शिवाजी चौकात १६ मार्चला सकाळी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात मराठी भाषाप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.
या वेळी प्रेमानंद साळगांवकर, सुरेश भोगटे, पुंडलिक दुळवी, सचिन पाटकर, शब्बीर मणियार, आशिष सुभेदार, उमा वारंग आदी मराठी भाषाप्रेमी उपस्थित होते.