…तर राज्यातील सरकार कोसळेल ! – अभिनेत्री कंगना राणावत
मुंबई – येथील पोलीस दलातील साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एन्.आय.ए.ने अटक केली. या अटकेनंतर राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणावरून अभिनेत्री कंगना राणावत हिने महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ‘या प्रकरणात एक मोठे कट कारस्थान शिजत असल्याचे मला दिसत आहे. या अधिकार्याला निलंबित करण्यात आले होते. शिवसेना सत्तेत आल्यानंतर त्याला परत सेवेत घेण्यात आले. याचे जर योग्य अन्वेषण केले, तर केवळ या प्रकरणातील रहस्यच बाहेर येणार नाही, तर राज्यातील सरकार कोसळेल. त्याच वेळी माझ्यावर २०० हून अधिक गुन्हे नोंद होतील, असे माझे मन सांगत आहे. जय हिंद’, असे ट्वीट कंगना यांनी केले आहे.