कोरेगाव पार्क येथे ‘स्पा सेंटर’च्या नावाखाली चालू होता वेश्याव्यवसाय !
समाजाची नैतिकता ढासळत चालल्याने आणि धर्मशिक्षण नसल्यामुळेच अशा प्रकारच्या गोष्टी सर्रास होत आहेत. संबंधितांवर तात्काळ आणि कठोर कारवाई व्हायला हवी तरच असे प्रकार थांबतील.
पुणे – कोरेगाव पार्क परिसरामध्ये ‘स्पा सेंटर’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने येथे धाड घालून अर्जुन गोपाल सिंग (वय २१ वर्षे) या व्यवस्थापकास कह्यात घेतले. ‘स्पा सेंटर’चे मालक विकास ढाले पळून गेले. या दोघांविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या ठिकाणाहून नागालँड, मणिपूर, राजस्थान येथील १० तरुणींची सुटका केली आहे.