पुणे येथील कोविड रुग्णालयातील रुग्णांना निकृष्ट जेवण मिळत असल्याची रुग्णांची तक्रार
पुणे – भोसरी येथील महानगरपालिकेच्या नवीन कोविड रुग्णालयातील बाधित रुग्णांनी जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार केली आहे. रुग्णांचे स्वास्थ्य निरोगी रहावे आणि रुग्ण लवकर बरे व्हावे, असे महानगरपालिकेला वाटत असेल, तर त्यांना उत्तम दर्जाचे जेवण देणे आवश्यक आहे, असेही रुग्णांनी सांगितले आहे.
या रुग्णालयामध्ये अन्न पुरवण्याचे कंत्राट पिंपळे गुरव येथील सावित्री महिला रोजगार संस्था बचत गटाला मिळालेले असून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निकटवर्तीय नगरसेविका उषा मुंढे या बचतगटाला मार्गदर्शन करतात. नगरसेविका उषा मुंढे यांनी सांगितले की, महानगर पालिकेच्या ‘वर्क ऑर्डर’पेक्षा दुप्पट जेवण दिले जात आहे. अल्प पैशात कोणी करणारे असेल तर त्यांनी करावे.