मुसलमान तरुणीने हिंदु तरुणाशी विवाह केला, तरी तरुणीने धर्मांतर केल्यावरच तो वैध ठरणार ! – पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय
चंडीगड – मुसलमान तरुणीने हिंदु तरुणाशी विवाह केला असला, तरी तरुणीने धर्मांतर केल्याखेरीज हा विवाह वैध ठरणार नाही. विवाह वैध ठरवण्यासाठी तिला धर्मांतर करावे लागेल, असा निर्णय पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. असे असले, तरी दोघे सहमतीने एकत्र राहू शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
Muslim Woman Didn’t Convert To Hinduism Before Marrying Hindu Man, Marriage Not Valid But Couple Entitled To Live-In-Relation: P&H High Court https://t.co/JVr1SrYV8l
— Live Law (@LiveLawIndia) March 13, 2021
१८ वर्षांची मुसलमान तरुणी आणि २५ वर्षांचा हिंदु तरुण यांनी १५ जानेवारी या दिवशी शिवमंदिरात जाऊन हिंदु पद्धतीने विवाह केला होता. यानंतर दोघांच्या कुटुंबियांकडून त्यांना धमक्या मिळाल्याने त्यांनी अंबाला पोलीस अधीक्षकांकडे सुरक्षा मिळण्यासाठी अर्ज केला होता; मात्र तेथून नकार मिळाल्यावर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने या दोघांना संरक्षण देण्याचा आदेश पोलीस अधीक्षकांना दिला. (धमक्या मिळणार्यांना संरक्षण देण्यास नकार देणार्या अशा पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)