भदोही (उत्तरप्रदेश) येथे ‘शंकर पार्वती बीडी’ या नावाने उत्पादनाची विक्री !
|
उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या देवतांचा अशा प्रकारे अवमान होत असतांना त्याविरोधात तक्रार होऊनही निष्क्रीय रहाणार्या पोलिसांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !
भदोही (उत्तरप्रदेश) – येथील सुरिंयावाँ भागामध्ये अनेक वर्षांपासून ‘शंकर पार्वती छाप बीडी’ नावाच्या विडीचे उत्पादन केले जात आहे. या उत्पादनाच्या पाकिटावर शंकर आणि पार्वती यांचे चित्रही छापण्यात आले आहे. या विडीचे अनेक जण उपयोग करून त्याची पाकिटे नाल्यांमध्ये आणि कचर्यात टाकत आहेत. यामुळे देवतांचा अवामन केला जात असल्याने धर्मप्रेमी शिव यादव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यावर कोणतीही कारवाई न झाल्याने यासंदर्भात माहिती अधिकारातून माहिती मागण्यात आली. यात ‘विडी उत्पादक विनय चौरसिया यांनी ३० वर्षांपूर्वी या नावाने नोंदणी केलेली आहे. यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही’, असे सांगण्यात आले.
(पोलिसांनी या संदर्भात पुढे जाऊन या संदर्भात कृती करणे अपेक्षित होते, ती का केली नाही, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे ! अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा असा अवमान झाला असता, तर पोलिसांनी अशीच भूमिका घेतली असती का ? – संपादक) याची माहिती मिळाल्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयातील अधिवक्ता अनय श्रीवास्तव यांनी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तक्रार करून उत्पादनावर शंकर आणि पार्वती यांचे चित्र यांचा वापर करण्यास बंदी घालण्याची मागणी केली.