भारताला शस्त्रपुरवठा करण्यास उपकरणे बनवण्यास सक्षम करणार ! – अमेरिका
वॉशिंग्टन (अमेरिका) – भारत हा एक स्वाभाविक, तसेच अमेरिकेचा उदयोन्मुख भागीदार आहे. आम्ही भारताला शस्त्रे आणि उपकरणे यांचा पुरवठा करून त्याचे सैनिकी आणि तांत्रिक सहकार्य अधिक दृढ करत आहोत. तसेच भारताला स्वतःचा संरक्षण औद्योगिक तळ विकसित करण्यासाठी काम करत आहोत. यामुळे भारत स्वतःला लागणारी उपकरणे सिद्ध करण्यास सक्षम होऊ शकेल. तसेच आमच्यासह प्रदेशातील इतरांसमवेत काम करण्यास सक्षम होऊ शकेल, असे प्रतिपादन अमेरिकेच्या पेंटागॉनचे ‘इंडो-पॅसिफिक सिक्युरिटी अफेअर्स’चे संरक्षण कार्यकारी साहाय्यक सचिव डेव्हिड हेल्वे यांनी केले आहे.