पुणे येथे अत्यवस्थ रुग्णांवर उपचारांसाठी लागणार्या ‘प्लाझ्मा’चा तुटवडा
पुणे, १३ मार्च – कोरोनाबाधित अत्यवस्थ रुग्णांवर ‘प्लाझ्मा’ ही प्रभावी उपचारपद्धत आहे; पण ते दान करणारे दातेच सापडत नाहीत. कोरोनामुक्त होऊन २८ दिवस झालेल्या व्यक्तींनी रक्तपेढीत ‘प्लाझ्मा’ दान करावा, असे आवाहन अन्न आणि आरोग्य प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त श्री. दिनेश खिंवसरा यांनी केले आहे.