‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीच्या फेसबूक पेजवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने विशेष मुलाखत प्रसारित
सोलापूर, १३ मार्च (वार्ता.) – हिंदु धर्मामध्ये महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी अनेकजण महाशिवरात्र हे व्रत भावपूर्ण करतात. महाशिवरात्रीच्या व्रतामागील शास्त्र भाविकांना कळावे, यासाठी ‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीचे संपादक श्री. अर्जुन फंड यांच्या पुढाकाराने ११ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात आली. ही मुलाखत हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्राची शिंत्रे यांनी घेतली. ही मुलाखत ‘झक्कास मराठी’च्या फेसबूक पेजवर ‘लाईव्ह’ करण्यात आली.
या मुलाखतीमध्ये शिवपिंडीला अर्ध प्रदक्षिणा का घालतात ?, शिवपिंडीवर दूध अर्पण करण्यामागे धर्मशास्त्रीय दृष्टीकोन कोणता ?, तसेच देवतांची विटंबना रोखण्यासाठी नेमके कसे प्रयत्न करावेत ? यांसारख्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्मविषयीच्या उपक्रमांना नियमित प्रसिद्धी देणारी ‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनी !
८ मार्च या दिवशी ‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीच्या फेसबूक पेजवरून हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात आली होती. यानंतर लगेचच ११ मार्च या दिवशी महाशिवरात्रीच्या निमित्तानेही विशेष मुलाखत प्रसारित करण्यात आली. अशा प्रकारे हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्मविषयक उपक्रमांना नियमित प्रसिद्धी देऊन राष्ट्रकार्यात ‘झक्कास मराठी’ मोलाचा वाटा उचलत आहे.
विशेष
‘झक्कास मराठी’च्या फेसबूक पेजचे ६८ सहस्र ‘फॉलोअर्स’ असून या ‘ऑनलाईन’ मुलाखतीचा २ सहस्र ९०० हून अधिक जणांनी लाभ घेतला.
कोरोनाच्या संसर्गकाळात ‘महाशिवरात्र कशी साजरी करावी ?’ याविषयी मुलाखतीत चर्चा
देशभरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते; मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने हे व्रत नेहमीप्रमाणे करण्यास मर्यादा होत्या. अशा परिस्थितीत महाशिवरात्र कशी साजरी करावी ?, महाशिवरात्रीला शिवतत्त्वाचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्या कृती कराव्यात ? याविषयी उपयुक्त सूत्रे आणि दृष्टीकोन या मुलाखतीत सांगण्यात आले.
खालील लिंकवर ही विशेष मुलाखत उपलब्ध आहे. – https://www.facebook.com/zakkasmarathi.in/videos/764787081134635/