दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पानांना नामजपाचे मंडल घातल्यापासून रत्नागिरी येथील साधकांना आलेल्या अनुभूती
८.१०.२०२० या दिवसापासून दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पानांना ‘॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥’ या नामजपाचे मंडल घालण्यास आरंभ करण्यात आला. त्यामुळे ‘रज-तमात्मक बातम्या आणि लेख यांमधून प्रक्षेपित होणारी नकारात्मक स्पंदने मंडलात बद्ध होऊन त्यांचा वाचकांना आध्यात्मिक स्तरावर त्रास होऊ शकणार नाही’, असे अध्यात्मातील जाणकारांनी सांगितले आहे. नामजपाचे मंडल घातलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकाविषयी साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. श्री. हनुमंत करंबेळकर, रत्नागिरी (१४.१०.२०२०)
अ. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’भोवती नामजपाचे मंडल घालायला आरंभ झाल्यापासून त्याकडे बघून मला छान वाटते.
आ. अंकामध्ये अधिक चैतन्य जाणवते आणि तो पूर्वीपेक्षा हलका जाणवतो.’
२. सौ. मंजिरी मोहन बेडेकर, रत्नागिरी (१४.१०.२०२०)
अ. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ हातात घेतल्यावर मला वेगळीच स्पंदने जाणवली.
आ. त्याकडे पाहिल्यावर माझा नामजप चालू झाला.
इ. अंक स्वच्छ आणि स्पष्ट दिसत होता, तसेच त्यातून चैतन्य प्रक्षेपित होत होते.
ई. तो अंक हातात घेतल्यावर माझ्यावरील नकारात्मक आवरण दूर होत असल्याचे जाणवले आणि माझ्यातील सकारात्मकता वाढत आहे, असे जाणवते.’
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |